
तानसेनने मिया मल्हार हा राग बांधला अशी अख्यायिका आहे. हा राग सर्व मध्यकालीन मल्हार रागांचा पाया आहे. हया रागात कोमल गंधार आणि दोन्ही निषाद आहेत. प्राचीन मल्हार रागांप्रमाणेच हया रागाच्या वादी आणि संवादी स्वरांबद्दल बरीच मतं आहेत. काही दिग्गज मध्यम-षड्ज हया स्वरांना वादी-संवादी मानतात. काही पंचम-षड्ज, तर काही षड्ज-पंचम. पण जर मध्यम हया रागाचा वादी स्वर मानला तर तो बहार रागाच्या अगदी जवळ जातो. मध्यम वादी स्वर धरला तर त्यावर न्यास करावा लागेल आणि तसं केल्याने बहार आणि मिया-मल्हार हया रागांमध्ये काही फरकच राहणार नाही! पंचम पण वादी स्वर नाही होऊ शकत कारण जर मिया-मल्हाराचे स्वरूप लक्षात घेतले तर ते षड्जाशिवाय स्पष्ट होऊच शकत नाही: “सा नि़ नि़ ध़ नि ध़ नि़ नि़ सा| सा, सारेसा, ध़ नि़ म़ प़, म़ प़ नि़ नि़ ध़ नि़ नि़ सा, रेरेसा|” तथापि मिया मल्हाराचा वादी स्वर षड्ज असणंच उचित आहे; आणि संवादी पंचम.
मिया-मल्हार हा राग मल्हार आणि कानडा रागाचे मिश्रण आहे. ह्यात “नि्प मप गमरेसा” हे कानडाचे अंग आहे आणि “मरे रेप” हे मल्हाराचे अंग आहे. वरील कानडा रागाचे अंग राग बहार मध्ये देखील येते पण फरक एवढाच की राग मिया-मल्हार मध्ये गंधार आंदोलित आहे, जो बहार मध्ये नाही. दुसरा फरक असा की मिया-मल्हारमध्ये मध्यमाला गौण स्थान आहे पण बहार रागाचा तो वादी स्वर आहे. हया सूक्ष्म फरकांवरून लक्षात येईल की भारतीय अभिजात संगीत हे किती बरकाईने अभ्यासावे लागते आणि मगच ते आत्मसात करता येते. छोट्या छोट्या फरकांमुळे राग बदलू शकतो त्यामुळे स्वरांवर हुकुमत मिळवणे खूप महत्वाचे आहे. खालील लिंकवर तुम्ही पंडित भीमसेन जोशी ह्यांनी गायलेली मिया-मल्हार रागातील सुप्रसिद्ध बंदीश, “करीम नाम तेरो” ऐकू शकता:
पंडित भीमसेन जोशी - राग मिया मल्हार
अनेक चित्रपटातील गाणी देखील मिया-मल्हार मधे आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय झालेलं म्हणजे “गुड्डी” चित्रपटातील जया भादुरीच्या तोंडी असलेलं, वाणी जयराम ह्यांनी गायलेलं, वसंत देसाई ह्यांचं संगीत लाभलेलं हे गीत:
बोल रे पपीहरा - राग मिया मल्हार आधारित
ह्याच अंगाची शास्त्रीय बंदिश आहे ज्याची सुरुवात देखील “बोल रे पपीहरा” अशीच होते. पुढील लिंकवर पंडित डी.व्ही. पलुस्कर ह्यांनी गायलेली ही बंदिश तुम्ही ऐकू शकता. बघा बरं हया बंदिशीत आणि वरील गाण्यात काही साम्य सापडतयं का?
बंदिश - बोल रे पपीहरा - राग मिया मल्हार
आता हीच बंदिश खास पंडित कुमार गंधर्वांच्या अंदाजात ऐकूयात:
बंदिश - बोल रे पपीहरा - पं. कुमार गंधर्व
अजून एक अतिशय सुंदर गाणं आहे, ह्याच रागावर आधारलेलं पण तितकसं प्रसिद्ध न झालेलं! ते म्हणजे “सम्राट पृथ्वीराज चौहान” हया १९५९ सालच्या चित्रपटातील, लता मंगेशकर ह्यांनी गायलेलं:
ना ना ना बरसो बादल - राग मिया मल्हार आधारित
सूरमल्हार
मध्यकालीन मल्हारांचे दुसरे उदाहरण म्हणजे राग सूरमल्हार जो राग मल्हार, राग देस आणि राग सारंग ह्यांचे मिश्रण होय. हा राग सूरदास ह्यांनी बांधला म्हणून हे नाव त्यास दिले गेले आहे. काहीजण मानतात की हा राग फक्त राग सारंग आणि राग मल्हार ह्याचा संयोग आहे पण मग तशा सूर-मल्हारामध्ये धैवत स्वर येता कामा नये. पंडित भातखंडे ह्यांच्या पुस्तक मालिकेत एक सोडून सगळ्या बंदिशी बिना धैवाताच्या आहेत. हा राग गाताना रिषभावर न्यास देऊन चालत नाही कारण रागाचे स्वरूप नष्ट होऊन त्यात राग सारंग जास्त दिसू लागतो. त्यामुळे, “मरे, पमरे, निपमरे” असे स्वर-समूह घेऊ नयेत. सूर-मल्हार हया रागात, “प, रे, म, मरे, रेप” हा मल्हार दिसतो, “निप, मप, रेम, पनिमप, म, मपनिसो, रैसो” हा सारंग दिसतो आणि “सोनिध, मपनिधप, रेमपनिधप” हा देस राग दिसतो. वरील चर्चेतून असे म्हणता येईल की सूर-मल्हार दोन प्रकारांचे असतात; एक सारंग आणि मल्हाराचा मिलाप आणि दुसरा ज्यात धैवतही येतो, तो म्हणजे सारंग, देस आणि मल्हाराचा मिलाप. काहीजण सूर-मल्हारमध्ये कोमल गंधाराचाही उपयोग करतात जसं, “गमरेसा” किंव्हा “रेगरेसा”. पण हा प्रकार जास्त प्रचलित नाही.
खालील लिंकवर तुम्ही पंडित भीमसेन जोशी ह्यांनी गायलेला राग सूर-मल्हार ऐकू शकता. बघा बरं ह्यात त्यांनी धैवत वापरला आहे का नाही ते!:
राग सूर-मल्हार - पंडित भीमसेन जोशी
राग सूर-मल्हारावर देखील काही चित्रपटातील गाणी आधारलेली आहेत. त्याचे एक खास उदाहरण म्हणजे १९६७ मधील “राम राज्य” हया चित्रपटातले, जे गायलं आहे लता मंगेशकर ह्यांनी आणि ज्याचे संगीत वसंत देसाई ह्यांनी दिले आहे. पुढील लिंकवर तुम्ही हे गाणं ऐकू शकता:
डर लागे गरजे बदरिया - राग सूर-मल्हार आधारित
रामदासी मल्हार
हा राग देखील मध्यकालीन मल्हारांमध्येच येतो. ह्याची अनेक रूपे आहेत. काहीजण राग मिया-मल्हारात “रे ग म” असा शुद्ध गंधार वापरून रामदासी मल्हार गातात. आजकाल गायल्या जाणाऱ्या रामदासी मल्हारामध्ये दोन्ही गंधार आणि दोन्ही निषाद वापरले जातात आणि राग मिया-मल्हार हा त्याचा पाया बनतो. जसे, मिया-मल्हाराच्या “म मरे, मरेप, प मग, मरेसा” मध्ये “सारेगगम, मगम, पमग, मरेसा” असं पूर्वांग आणि “मपधनिधनिसो” हया मिया-मल्हाराच्या उत्तरांगातल्या स्वर-समुहाला “मपधनिधपमगम” किंव्हा “सोधनिप, मपधनिप” अश्या प्रकारच्या स्वर-संगती घेऊन राग रामदासी-मल्हार मांडला जातो.
पुढील लिंकवर तुम्ही पंडित रामश्रेय झा (रामरंग) ह्यांनी गायलेल्या राग रामदासी मल्हार मधील काही बंदिशी ऐकू शकाल. त्यात ते सांगतात कुठे कसे स्वर वापरले गेले आहेत, कुठे शुद्ध गंधार आहे. ह्यावरून राग रामदासी मल्हाराचे स्वरूप लक्षात येते.
राग रामदासी मल्हार - बंदिशी - पं. रामश्रेय झा
उस्ताद अमीर खान रामदासी मल्हारमध्ये दोन्ही गंधार वापरतात. ऐकूयात पुढील लिंकवर:
राग रामदासी मल्हार - उ.आमीर खानसाहेब
जयपूर-अत्रौली घराण्यात रामदासी मल्हार गाताना कोमल गंधाराला जास्त महत्व देतात आणि शुद्ध गंधाराला कमी. मिया-मल्हार रागाचा हया घराण्याने गायलेल्या रामदासी मल्हार वर खूप प्रभाव दिसून येतो.
ज्यांना कंठ संगीतापेक्षा वाद्य संगीत जास्त प्रिय आहे त्यांच्यासाठी पं. तेजेन्दर मुजुमदार ह्यांनी सरोद वर वाजवलेला राग रामदासी मल्हार पुढील लिंकवर उपलब्ध आहे:
राग रामदासी मल्हार -पं. तेजेन्दर मुजुमदार
पं. रामश्रेय झा उ. आमीर खानसाहेब पं. तेजेंदर मुजुमदार
नटमल्हार
मध्यकालीन मल्हाराचे अजून एक उदाहरण म्हणजे राग नटमल्हार. ह्याचे आकर्षक स्वरूप हे राग नट आणि मल्हार हया दोन रागांच्या संगमाचा परिणाम आहे. हा नटमल्हार दोन-तीन प्रकारे गायला जातो. काहीजण दोन्ही गंधार आणि निषाद वापरतात. काहीजण दोन्ही निषाद आणि बाकी सर्व स्वर शुद्ध वापरतात. फक्त शुद्ध गंधार वापरून सुद्धा हा राग दोन प्रकारे गातात. एका प्रकारात राग नट आणि राग मल्हाराचे मिश्रण करून, मिया-मल्हारातील दोन निषादांचा प्रयोग मधून मधून दाखवतात. दुसऱ्या प्रकारात केवळ नट, शुद्ध मल्हार आणि बिलावल रागाचे मिश्रण करून गातात. हा प्रकार गौड-मल्हाराच्या जवळ जातो. बहुतेक वेळेला हा राग हया शेवटच्या तत्वांना अनुसरूनच गायला जातो. ह्यात “गरे, गरेग, रेगम, मगमरे” आणि “गम सारेसा” हे स्वर-समूह नट रागाचे आहेत. “म रे रे रे प, ध सो ध प म” हे स्वर शुद्ध मल्हाराचे आहेत आणि रागाच्या उत्तरांगात, “पनिध नि सो, ध नि प” हा स्वर-समूह बिलावल रागाचा आहे.
गंधार हा नट रागाची पुष्टी करतो आणि निषाद बिलावलची म्हणून नट-मल्हारात गंधार आणि निषादाचा उपयोग योग्यरित्या होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ “ गरे गरे मगम” किंव्हा “ गरे गरे ग” हे स्वर-समूह नट रागाची पुष्टी करतात पण तेच जर “ मरे मरे प” असे स्वर घेतले तर ते मल्हाराचे स्वरूप दाखवतात. हे सगळे मुद्दे लक्षात घेता राग नट-मल्हाराचे मुख्य स्वरूप, “सा गरे गरे ग, ग म, मरे मरे प, ध ध प म प म ग म रे सा|” असे आहे असं म्हणता येईल. पुढील लिंकवर तुम्ही पंडित रामश्रेय झा ह्यांनी गायलेला राग नट-मल्हार तुम्ही ऐकू शकता:
राग नट-मल्हार - पं. रामश्रेय झा
जरी नट-मल्हाराचे पारंपारिक स्वरूप वरीलप्रमाणे असले तरी पुढील लिंकवर गानसरस्वती श्रीमती किशोरी आमोणकर ह्यांनी गायलेल्या नट-मल्हारात त्या मिया मल्हारासारखा दोन निषादांचा उपयोग करतात:
राग नट-मल्हार - श्रीमती किशोरी अमोणकर
हया रागावर खूपशी हिंदी गाणी नाहीत पण येसुदास ह्यांनी गायलेलं “आलाप” हया चित्रपटातील गाणं थोडे का होईना हया रागावर आणि जयंत-मल्हारावर आधारलेलं आहे. हे जयदेव ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. गीत तुम्हाला पुढील लिंकवर ऐकता येईल:
चाँद अकेला - राग नट-मल्हार आधारित
गानसरस्वती किशोरी आमोणकर
तर असे आहेत हे मध्यकालीन मल्हार. ह्याची अजून उदाहरणे म्हणजे मीराबाई की मल्हार, धुलिया/धुंडीया मल्हार, गौडगिरी मल्हार, चारजू की मल्हार, जयंत मल्हार. हे राग कोण्त्या रागांचे मिश्रण आहे ते काहींच्या नावावरून उघड आहे; जसे जयंत मल्हार हा जयजयवंती आणि मिया-मल्हार हया रागांचे मिश्रण आहे.
हया लेखमालेच्या अंतिम भागात आपण अर्वाचिन मल्हारांबद्दल माहिती वाचणार आहोत. हा राग देखील मध्यकालीन मल्हारांमध्येच येतो. ह्याची अनेक रूपे आहेत. काहीजण राग मिया-मल्हारात “रे ग म” असा शुद्ध गंधार वापरून रामदासी मल्हार गातात. आजकाल गायल्या जाणाऱ्या रामदासी मल्हारामध्ये दोन्ही गंधार आणि दोन्ही निषाद वापरले जातात आणि राग मिया-मल्हार हा त्याचा पाया बनतो. जसे, मिया-मल्हाराच्या “म मरे, मरेप, प मग, मरेसा” मध्ये “सारेगगम, मगम, पमग, मरेसा” असं पूर्वांग आणि “मपधनिधनिसो” हया मिया-मल्हाराच्या उत्तरांगातल्या स्वर-समुहाला “मपधनिधपमगम” किंव्हा “सोधनिप, मपधनिप” अश्या प्रकारच्या स्वर-संगती घेऊन राग रामदासी-मल्हार मांडला जातो.
पुढील लिंकवर तुम्ही पंडित रामश्रेय झा (रामरंग) ह्यांनी गायलेल्या राग रामदासी मल्हार मधील काही बंदिशी ऐकू शकाल. त्यात ते सांगतात कुठे कसे स्वर वापरले गेले आहेत, कुठे शुद्ध गंधार आहे. ह्यावरून राग रामदासी मल्हाराचे स्वरूप लक्षात येते.
राग रामदासी मल्हार - बंदिशी - पं. रामश्रेय झा
उस्ताद अमीर खान रामदासी मल्हारमध्ये दोन्ही गंधार वापरतात. ऐकूयात पुढील लिंकवर:
राग रामदासी मल्हार - उ.आमीर खानसाहेब
जयपूर-अत्रौली घराण्यात रामदासी मल्हार गाताना कोमल गंधाराला जास्त महत्व देतात आणि शुद्ध गंधाराला कमी. मिया-मल्हार रागाचा हया घराण्याने गायलेल्या रामदासी मल्हार वर खूप प्रभाव दिसून येतो.
ज्यांना कंठ संगीतापेक्षा वाद्य संगीत जास्त प्रिय आहे त्यांच्यासाठी पं. तेजेन्दर मुजुमदार ह्यांनी सरोद वर वाजवलेला राग रामदासी मल्हार पुढील लिंकवर उपलब्ध आहे:
राग रामदासी मल्हार -पं. तेजेन्दर मुजुमदार
पं. रामश्रेय झा उ. आमीर खानसाहेब पं. तेजेंदर मुजुमदार
मध्यकालीन मल्हाराचे अजून एक उदाहरण म्हणजे राग नटमल्हार. ह्याचे आकर्षक स्वरूप हे राग नट आणि मल्हार हया दोन रागांच्या संगमाचा परिणाम आहे. हा नटमल्हार दोन-तीन प्रकारे गायला जातो. काहीजण दोन्ही गंधार आणि निषाद वापरतात. काहीजण दोन्ही निषाद आणि बाकी सर्व स्वर शुद्ध वापरतात. फक्त शुद्ध गंधार वापरून सुद्धा हा राग दोन प्रकारे गातात. एका प्रकारात राग नट आणि राग मल्हाराचे मिश्रण करून, मिया-मल्हारातील दोन निषादांचा प्रयोग मधून मधून दाखवतात. दुसऱ्या प्रकारात केवळ नट, शुद्ध मल्हार आणि बिलावल रागाचे मिश्रण करून गातात. हा प्रकार गौड-मल्हाराच्या जवळ जातो. बहुतेक वेळेला हा राग हया शेवटच्या तत्वांना अनुसरूनच गायला जातो. ह्यात “गरे, गरेग, रेगम, मगमरे” आणि “गम सारेसा” हे स्वर-समूह नट रागाचे आहेत. “म रे रे रे प, ध सो ध प म” हे स्वर शुद्ध मल्हाराचे आहेत आणि रागाच्या उत्तरांगात, “पनिध नि सो, ध नि प” हा स्वर-समूह बिलावल रागाचा आहे. गंधार हा नट रागाची पुष्टी करतो आणि निषाद बिलावलची म्हणून नट-मल्हारात गंधार आणि निषादाचा उपयोग योग्यरित्या होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ “ गरे गरे मगम” किंव्हा “ गरे गरे ग” हे स्वर-समूह नट रागाची पुष्टी करतात पण तेच जर “ मरे मरे प” असे स्वर घेतले तर ते मल्हाराचे स्वरूप दाखवतात. हे सगळे मुद्दे लक्षात घेता राग नट-मल्हाराचे मुख्य स्वरूप, “सा गरे गरे ग, ग म, मरे मरे प, ध ध प म प म ग म रे सा|” असे आहे असं म्हणता येईल. पुढील लिंकवर तुम्ही पंडित रामश्रेय झा ह्यांनी गायलेला राग नट-मल्हार तुम्ही ऐकू शकता:
राग नट-मल्हार - पं. रामश्रेय झा
जरी नट-मल्हाराचे पारंपारिक स्वरूप वरीलप्रमाणे असले तरी पुढील लिंकवर गानसरस्वती श्रीमती किशोरी आमोणकर ह्यांनी गायलेल्या नट-मल्हारात त्या मिया मल्हारासारखा दोन निषादांचा उपयोग करतात:
राग नट-मल्हार - श्रीमती किशोरी अमोणकर
हया रागावर खूपशी हिंदी गाणी नाहीत पण येसुदास ह्यांनी गायलेलं “आलाप” हया चित्रपटातील गाणं थोडे का होईना हया रागावर आणि जयंत-मल्हारावर आधारलेलं आहे. हे जयदेव ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. गीत तुम्हाला पुढील लिंकवर ऐकता येईल:
चाँद अकेला - राग नट-मल्हार आधारित
गानसरस्वती किशोरी आमोणकर
तर असे आहेत हे मध्यकालीन मल्हार. ह्याची अजून उदाहरणे म्हणजे मीराबाई की मल्हार, धुलिया/धुंडीया मल्हार, गौडगिरी मल्हार, चारजू की मल्हार, जयंत मल्हार. काहींच्या नावावरून उघड आहे की कुठल्या रागांचे मिश्रण आहे; जसे जयंत मल्हार हा जयजयवंती आणि मिया-मल्हार हया रागांचे मिश्रण आहे. हया लेखश्रुन्खलेच्या अंतिम भागात आपण वाचणार आहोत अर्वाचिन मल्हारांबद्दल.