
लेखक - उत्पल व. बा
निवेदन- धीरेश जोशी, ओंकार कुळकर्णी
संग्रहातील प्रमुख लेख दोन मित्रांच्या संवादातून उलगडत जाणाऱ्या अनेकपदरी विषयांचा गोफ विणणारे आहेत. दोघातील एक म्हणजे मन्या बोडस, एक होतकरू लेखक आणि दुसरा त्याचा मित्र, मी - जो तुमच्या आमच्यापैकी कुणीही असू शकेल! कला-साहित्य आणि इतर समकालीन विषयांवर या दोघांचा वाद-संवाद वाचकांना खिळवून ठेवतो. 'मन्या बोडस आणि मी' या मुख्य धाग्याव्यतिरिक्त समकालीन वास्तवावर टिप्पणी करणारे इतरही काही ललित लेख संग्रहात समाविष्ट करण्यात आले आहेत. तिरकस, खुसखुशीत शैलीतील हे सगळे लेख वाचकांना हसत हसत दाद द्यायला लावतात आणि विचारचक्रात गुंतवूनही ठेवतात! अशा निवडक लेखांचा संग्रह - तीन त्रिक दहा
Price:
$1.99
Category: