
भारतीय संगीतातील कोमल रिषभ
भटियार रागातील कोमल रिषभ बघितला तर भैरवासारखा स्वतःची ओढ लावणारा नसून, हळूच नकळत प्रकट होणारा आहे: 'सा म, म प ग, पगरे्सा| सारेसासाम, मपग, म् धप, धs प धs म, पगरे्सा|' असा लपत-छपत, धैवताच्या अवती-भवती फिरून झाल्यानंतर, नेहमी पंचम आणि गांधाराच्या आसऱ्यातून हळूच उमलणारा कोमल रिषभ. राग अहिरभैरवात देखील भैरवासारखाच कोमल रिषभ येतो पण त्यात त्याला कोमल धैवताची साथ नसते.
लेखन आणि निवेदन - वर्षा हळबे
Price:
$0.25
Category: