
लेखिका- सुषमा दातार, निवेदन- मधुरा गोखले
सफाईदारपणे वळवून नवी कोरी बाईक त्यानं नेमकी तिच्यासमोर उभी केली.बाबानी मनासारखी बाईक घेऊन दिल्याचा आनंद त्याच्या ऐटीतून ओसंडत होता. नव्या बाईकवर आईला राईड देण्याची कृपा करून त्यानं आपली हेलमेटमंडित मान हलवूनत इशारा केला मागे बसायचा.साडीच्या लपेटीतून ती केव्हाच बाहेर पडलेली असल्यानं साईड सॅडल बसायचा विचार सुध्दा तिच्या मनात आला नाही.ओढणीलाही रजा दिलेली असल्यानं सलवार कमिजातली ती सहजच दोन्ही बाजूला पाय टाकून त्याच्या मागे बसली.
Category: