ग्रेस यांना विनम्र श्रद्धांजली

मराठी साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे सोमवारी सकाळी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात निधन झाले. १९६८ साली त्यांना संध्याकाळच्या कविता या संग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या 'वा-याने हलते रान' या ललितसंग्रहाला २०११ सालचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर झाला होता. लयबध्द कविता हे ग्रेसांच्या कवितेचे बलस्थान. कवितेतल्या उपमा, रूपके , लय यांचा वापर करण्याचा मोह कविता करणा-याला टाळता येत नाही- अस्वस्थ क्षणांना यांच्या कवितेची सोबत असते. त्यांची कविता दुर्बोध आहे पासून ती कशी दुर्बोध नाही हे सांगणा-यांची स्पर्धा सुरु असते. 'सांध्यपर्वातील वैष्णवी' या कविता संग्रहातील 'भ्रम' या कवितेमधील सुरुवातीच्या चार ओळी -
बघ सूर्य बुडाया आला 
अंधार दिसेना तुजला?
पणतीवर पणती जळता
भ्रम पडतो हाच जिवाला..

साहित्यसंस्कृती तर्फे या महाकवीला विनम्र श्रद्धांजली.

About the Author

साहित्यसंस्कृती