सवयी बदला, नवे आयुष्य जगा

सवयी का बदलता येत नाहीत?

मी योग्य तो आहार घेईन, मी सिगरेट सोडेन, मी व्यायाम करेन असे अनेक चांगले बदल करण्याचा आपला प्रयत्न असतो. पण प्रत्यक्षात ते येत नाही. त्याची कारण अनेक असतात. अनेकदा फक्त आपला निश्चय कमी पडतो असे वाटते. हा निश्चय वाढावा म्ह्णून पुढील काळजी घ्या.

पोषक वातावरण तयार करा

नुसत्या इच्छाशक्तीच्या बळावर विसंबून राहू नका. त्याला जोड म्हणून आपले राहणीमान बदला. जंक फूट टाळण्यासाठी शरीराला पोषक असे अन्नपदार्थ फळे जवळ ठेवा.

व्यायाम करायचा असेल तर त्याला आवश्यक साधने- धावतांना घालायचे कपडे, शूज, वेटस, सतरंजी सगळे हाताजवळ आणि नजरेच्य टप्प्यात ठेवा. मोबाईल वापरत असाल तर त्यात अलार्म सेट करा, तो अलार्म टाळू नका.

सवय बदलणे सोपी गोष्ट नाही लक्षात ठेवा

आपल्याला सगळ सहज हव असत. जे सहज मिळत नाही ते टाळण्याची प्रवृत्ती असते. म्हणून अनेक लोक रोज व्यायाम करत नाहीत, वा पथ्य पाळू शकत नाहीत. चांगल्या सवयी अंगवळणी पडण्याकरता थोडे कष्ट, डिस्कंफर्ट सहन करावाच लागेल हे मनाला समजवा.

कोणताही बदल - तोही योग्य दिशेने हा कधीच सोपा नसतो. कष्ट घेण्याची तयारी ठेवा.मनाविरुद्ध वागावे लागेल हे मान्य करा.

छोटया ट्प्पाने सुरूवात करा

लोळत पडण्याची सवय झालेल्या माणसाला एकदम पाच मैल वा चार किलोमीटर चालण शक्य नाही. पण आपण नेहमी मोठे ध्येय समोर ठेवतो, ते गाठ्ता आले नाही म्हणून निराश होतो आणि सोडून देतो.

यापेक्षा मी पाव किलोमीटर चालेन, फक्त पुढच्या चौकापर्यंत जाईन चार दिवस अशा छोट्य़ा पण नियमित टप्पाने सुरुवात करा. मग मोठ्या टप्पाकडे, जास्त वेग वा वेळ जे काही लागू पडत ते वाढवत जा.

स्वप्नवत वा अवास्तव अपेक्षा सोडा

अवास्तव अपेक्षा, अचानक झटका आला आणि सुरुवात केली असे करण्यापेक्षा शांतपणे विचार करून वास्तवात काय करू शकतो याचा विचार करा. ऑलेंपिक मध्ये गोल्ड मेडल मिळवणे हे ध्येय असू शकते. पण त्याकरता आपली तयारी व इतर अनेक मुद्दे तपासावे लागतील. ते ध्येय गाठणे शक्य नाही म्हणून काहीच हातपाय न हलवणे हे योग्य नाही. रोज तीन पाकिटे सिगरेट पिणा-या माणसाने एकदम सिगरेट सोडणे शक्य आहे पण त्याचे इतर परिणाम तपासून पुढे जाणे योग्य. एक सिगरेट ओढली म्हणून नाराज होऊन पुन्हा तीन पाकिटांवर  गाडी आणण हे तर अयोग्यच.

जबाबदारी घेणे

एखादा निश्चय केला की तो जवळच्या व्यक्तीला वा मित्राला सांगा. तुम्ही ते ध्येय गाठले नाही तर स्वत:ला काय शिक्षा करून घेणार ते सांगा. तसे वागा. ही जबाबदारीची जाणीव योग्य मार्गावर राहण्यास मदत करते.

 

About the Author

admin's picture
admin