पुन्हा सोमवार!

जी कामे संपावायची होती ती झाली नाहीत. प्रश्न सुटेल नाहीत आणि पुन्हा सोमवार हजर! आता काय उपाय काढायचा? 

एखादं काम का पुढे ढकलता? त्यावेळी तुम्ही काय करता?
 मिटिंग मनासारखी झाली नाही,प्रोजेक्ट हातातून गेलं, मैत्रिणीनं नकार दिला असे अडथळे समोर आले की त्यांचा सामना करण्याऐवजी कॉफी शॉपमध्ये, मॉलमध्ये वेळ घालवता?टीव्ही पाहाता?नेट ब्राऊझ करता?
यू आर नॉट अलोन! 
प्रोब्लेम सामने - मार पलटी! सिंपल!
संगीतकार, गीतकार, लेखक यांच्याप्रमाणे अगदी दहावीतला मुलगासुद्धा काही अडथळा आला की उकरून भलभलती कामं आणि कारण आठवतो. आय.टी, बॅंक, आर्किटेक्चर सगळ्या क्षेत्रांमध्ये असंच चित्र दिसेल.
जी माणसं यशस्वी होतात त्यांना काय अडथळे येत नाहीत का?येतात तर. पण ती त्यापासून पळत नाहीत. त्यावर उपाय काढतात. आपणही उपाय काढू शकतो.
नथिंक वर्क्स? असं सुद्धा वाटत ना कधी! पण तरी प्रयत्न करा. काय कराल?
१.थोडं थांबा
२. स्वत:ला प्रश्न विचारा.
३.जे काम अपूर्ण आहे ते पूर्ण करायला सुरुवात करा.
४.काम मनासारखं होत नाही असं वाटत असेल तर एक फेरी मारून या- १० मिनिटांचा ब्रेक घ्या, पुन्हा कामाला लागा.
५.मार्गदर्शन करू शकेल अशा व्यक्तीला गाठा, तिचा सल्ला घ्या.
६.सगळे दोर कापून टाका- व्यत्यय येईल असे सर्व काही बंद करा, त्यापासून दूर राहा. काम पूर्ण करणं हाच एक मार्ग आहे हे ध्यानात घ्या.

 सर्व प्रयत्न केले हे एकदा पक्कं झालं की अपयशाचा सामना सोपा जातो. प्रयत्न करा. यश मिळेलच.
Happy Monday!

About the Author

admin's picture
admin