किरकिरा की

कोण आहे तो? किरकिरा, चिडचिडा आणि त्रासलेला एक प्राणी! जेव्हा पहावे तेव्हा कशाला तरी तो नावे ठेवतो,तक्रारी करतो. दुस-यांचं वागण त्याला नेहमीच खटकत. इतरांच्या चुका त्याला कायम दिसतात.मीही त्याच्याकरता अपवाद नाही. चहा पिण्यापासून, रुमालाचा रंगावरून तर टाय लावण्यापर्यंतच्या कशावरही तो तोंडसुख घेतो. कोण आहे हा?
त्याची एक ओळख म्हणजे माझा लोकलमधला मित्र! आम्ही सेम लोकल घेतो. उतरतो सुद्धा एकाच ठिकाणी. एकाच टॅक्सीने पुढे जातो...आमची वयं साधारण सारखीच.
 त्याला अगदी छोटया छोटया गोष्टी दिसतात - तू असं करू नकोस, तसं करायला नको होत इत्यादी..ते सर्व तो म्हणजे रोज जाता येता, न चुकता माझ्या भल्यसाठी सांगत असतो.(हेही तोच म्हणतो!)
सुरुवातीला मला राग यायचा, कधी त्रास व्हायचा, कधी स्वत:वरच शंका घ्यायचो! त्याच्या बोलण्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही असं ठरवल तरी ते शक्य होत नव्हतं. इतर तणावही होतेच.

तेव्हा जाणवलं आपल्या आजूबाजूला असे नकारार्थी दृष्टीकोन असणारे अनेक असतात. खच्चीकरण करणारे!  काही मुद्दाम करतात तर काही त्यांच्या नकळत असे वागत असतात. त्या वागण्याला वयाच बंधन नाही, स्त्री पुरुष असा भेदभाव नाही. पण त्यांच्या वागण्या-बोलण्याने इतरांच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. इतरांची वाटचाल अधिकच बिकट होते. 
बाबांचे एक मित्र समुपदेश करतात. योगायोगाने त्यांची भेट झाली. ते म्हणाले," अशी माणसे अनेकदा स्वत:च त्रासलेली असू शकतात. तशी नसतील तर त्यापैकी काहींना लोकांना त्रास दिला की आनंद होतो. त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते.शक्य असेल तर अशा व्यक्तीपासून दूर राहा, तसेच त्यांच्याकडे दूर्लक्ष करायला शिका.  डोन्ट लेट देम ड्रॅग यू डाऊन! 

ते पुढे म्हणाले ,"तू कुणाला शोधतो आहेस माहिती आहे?  आनंदात सामील होणारी,  सहकार्य करणारी, म्हणणं ऐकून घेणारी, प्रोत्साहन देणारी  व्यक्ती! 

तुमच्यावर खूप प्रेम करणारी, जिवाभावाची  व्यक्ती सुद्धा काही वेळा ही गरज लक्षात घेऊ शकत नाही, ती पूर्णही करू शकत नाही.  पण आपण अशी व्यक्ती नाही तर अशा व्यक्ती शोधत असतो. असं कुणी नसेल तर इतरांसाठी तुम्ही तो ऊर्जेचा स्त्रोत व्हा."

Inspire people, enjoy their success, help them if they need it. 

Life is beautiful.

 

About the Author

admin's picture
admin