कॉलेज कविता-विशेषांकासाठी कविता पाठवा

कॉलेज कविता-विशेषांकासाठी कविता पाठवा

 फेब्रुवारीचा महिना उत्साहाचा, जोशाचा महिना. थोडीशी थंडी, त्यात असतो १४ तारखेला प्रेमाचा संदेश घेऊन येणारा व्हॅलेंटाईन्स डे. सगळंच वातावरण कसं भन्नाट आणि अफाट झालेलं असतं! हो ना? व्हॅलेण्टाईन्स डे सगळ्यांत जास्त रंगतो तो कॉलेजकट्ट्यावर.  कॉलेज म्हणजे यारी दोस्ती, धम्माल बेफिकीरी आणि त्याचसोबत काही धुंद आठवणीदेखील.

प्रेमाचा हा उत्सव आला की कविता आल्याच. कॉलेजच्या या जाणत्या-अजाणत्या वयामध्ये प्रत्येकानं एक तरी कविता कधीतरी करून पाहिलेली असते. म्हणूनच फेब्रुवारीचा यंदाचा अनाहत असेल कॉलेजकवी विशेषांक.

या विशेषांकामध्ये कॉलेजतरूणाईच्या कविता प्रसिद्ध केल्या जातील. अनाहत हे केवळ कवितेसाठी वाहिलेले ऑनलाईन मासिक आहे. अर्थात यासाठी केवळ प्रेमकविता पाठवायचं असं काही नाही, कविता कुठल्याही विषयावरील चालतील, फक्त त्या कॉलेजविद्यार्थ्यांनी केलेल्या असाव्यात एवढंच.

तुमच्या उत्तमोत्तम कविता आम्हाला जरूर पाठवा. कविता मराठी युनिकोड फॉन्टमध्ये टाईप केलेल्या असाव्यात.

कविता पाठवण्यासाठी पत्ता: anahatmagazine@gmail.com

डेडलाईन: 24 जानेवारी

आधिक माहितीकरता आमच्या साईटला जरूर भेट द्या. www.sahityasanskruti.com

For updates LIKE us on Facebook-

www.facebook.com/sahityasanskruti

-साहित्यसंस्कृती टीम

 

 

 

About the Author

admin's picture
admin