एफ-१/१०५

लेखक: आशुतोष पोतदार ,दिग्दर्शन व नेपथ्य : मोहित टाकळकर 

प्रकाश योजना: प्रदीप वैद्य ,वेशभूषा: रश्मी रोडे 

निर्मिती सूत्रधार: आशिष मेहता ,स्थिर चित्रण: जय जी, सारंग साठये 

कलाकार: मृण्मयी गोडबोले, राजकुमार तांगडे, सागर देशमुख, तृप्ती  खामकर, आनंद क्षीरसागर, जीवक मोरे, हृषीकेश पुजारी, ओमप्रकाश शिंदे व आलाप वैद्य 

 

नाटकाविषयी:

एफ़-वन/वन झिरो फ़ायव हे नाटक आपले घर हिरव्या रंगाने सजवू पाहाणा-या सागर आणि मुमू या दोन पात्रांची आणि त्यांच्या कुटुंबाची गोष्ट आहे. सागर आणि मुमू विविध भाषा आणि संस्कृतीबरोबर नांदणा-या एका ‘लिबरल’ रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समधे राहातात. पण, हिरवा रंग देवून घर सजवण्याचे वर वर साधे वाटणारे काम म्हणजे कुटुंबाचे आयुष्य ढवळून टाकणारी घटना ठरते. रंगांना देव मानत आणि ‘नॉर्थ’ नावाच्या कुठल्या तरी संदिग्ध ठिकाणावरुन येऊन काबाडकष्ट करणा-या डॉन पेंटरला रंगाने पछाडलेला आणि रंगाला ओळखीच्या राजकारणातील दुधारी अस्र करणारा ‘समाज’ आपल्या झुंडप्रवृत्तीने आवळून टाकतो.

मराठी बरोबरच हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमधे घडणारे एफ़- वन/ वन झिरो फ़ायव हे नाटक माणसांचे भाषा आणि संस्कृतीचे व्यवहार, त्यांची धार्मिक-आर्थिक-सामाजिक व्यवस्था यांच्या नानाविध ‘रंग’ छटा सादर करत समकालिन बहुसांस्कृतिक समाजाचा एक अंधारा आणि दुखरा कोपरा समोर आणते. नासत चाललेले व्यक्ति-संबध, बहुपदरी सत्ताकारण, एकमेकांबद्दल आणि भवतालाबद्दल विश्वास गमावलेले माणसांचे भावनिक विश्व यामधून येणारे रंगांचे भान आणि राजकारण हे नाटक दाखवते. समकालिन बहुसांस्कृतीक समाजातली संकूचित वृत्ती, सामाजिक व्यवस्थांमधली उतरंड, विविध संस्कृतीमधला निखळत चाललेला व्यापक दुवा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा तीव्र संकोच  एफ़- वन/ वन झिरो फ़ायव हे नाटक दचकवून टाकणा-या रंगमंचीय भाषेत सादर करते.

पाठिंबा: इंडिया फ़ाऊंडेशन फ़ॉर द आर्टस, बेंगलुरु.

 

नाटक पाहून आल्यावर जुई कुलकर्णी हिची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.
..............
रंग
रंग असतात
रंगासोबत अनैक संदर्भ असतात
तरीसुद्धा रंग 'नुसते ' असतात.
सगळेच रंग...
सगळीच स्पेस व्यापून असतात.
.....
हिरव्या भाज्या....हिरव्या बांगड्या .
हिरव्यागार भिंतीत हिरव्यागार दूर्वांत गणपती सजू शकतो , शकतोच... smile emoticon
......
झुंड रंग असोसिएशट करते.
झुंडच आपण , आपणच झुंड.
झुंडच न्यायनिवाड्याचं नाटकही करते.
झुंडीची भाषा झुंड हीच.
झुंड शोषण करते.
झुंड रॅगिंग करते.
झुंडच बळीही घेते. 
झुंड माणसं चिरडते ... बेचिराख करते....
...
हे नाटक जो विचार मांडतं तो भारी आहेच
पण जसा मांडतं तेही वेगळं आहे.
सटायर आणि त्यातून येणारी रंजकता आणि विनोद सुटत नाही तरी गंभीर विषयाचं गांभीर्य उणावत नाही. उलट अजूनच स्पष्ट होतं.
आशुतोष पोतदार यांचे लेखन मजबूत आहेच.
दिग्दर्शक मोहित टाकळकरनेही ते उत्तम साकारलंय.
आणि कलाकारांनी पेलंलय.
सगळ्याच कलाकारांची कामं चांगली आहेत.
तृप्ती खामकर आणि राजकुमार तांगडे अतिविशेष उल्लेखनीय.
प्रत्येक प्रयोगानंतर इंट्रो करायलाच हवीय.
...
मला नाटकं आवडतात.
मला 'प्रायोगिक' नाटकंही  आवडतात. आणि बहुतेक कळतातही 
मला 'आसक्त'ची नाटकं आवडतात. 
याचा मला आनंद आहे. 
....
भारी नाटक लिहलंयस मित्रा !!!! 

About the Author

जुई कुलकर्णी's picture
जुई कुलकर्णी

चित्रकार आणि कवी : जुई कुलकर्णी 2009 पासून फेसबुकवरून चित्र आणि कविता प्रकाशित .

स्व शिक्षित चित्रकार .

कवरपेज डिझायनिंग : मिळून साऱ्याजणी मासिक फेब्रुवरी 2012

मॅड स्वप्नांचे प्रवाह - काव्य संग्रह

शक्यतेच्या परिघावरून - काव्य संग्रह (आगामी)

रेखाटने : काही तीव्र मंद्र काही - काव्य संग्रह 'श्वासाचं बांधकाम ' हा स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित

अक्षर दिवाळी अंक , 'व' मासिक यातून कविता प्रकाशित .