घालता येणारे केळे

 हृदयाचे ठोके मोजण्याची सोय असलेलं घड्याळ, किती पावले चाललात , किती अंतर पार केले ते मोजणारे एखादे ब्रेसलेट किंवा बुटाची लेस घालून धावणारे चालणारे फिटनेस विषयी अतिशय जागरूक असलेले  लोक आपण बघतो. आज कोणतीही वस्तू विकायची म्हटली की त्यामध्ये टेक्नॉलॉजी,फॅशन आणि आपली सोय याची उत्तम सांगड यात घातली असणे आवश्यक आहे. डोल ने ही सर्व काळजी घेतली आहे.
डोल या कंपनी प्रामुख्यानं फळे विकते. विशेष: केळ्य़ांची विक्रेती म्हणून हा ब्रॅड माहिती आहे. डोलनं घड्याळ वा एखाद्या वस्त्रासारखी घालता येईल अशी केळी तयार केली आहेत. २००८ पासून डोल ही कंपनी जपानमधली सर्वात मोठी मॅरॉथॉन स्पर्धा प्रायोजित करते आहे. २०१५ साली ह्या स्पर्धेत काही धावपटू वेळ, हृद्याची गती, आणि ट्वीटरवरील प्रोत्साहनाचे ट्विट्स दाखवणारे केळं घड्याळासारखं घालून धावतील. पोटॅशियमचे प्रमाण संतुलित राखण्याकरता धावपटूला केळं खायचा सल्लाही मिळेल हे वेगळं सांगायला नको.
सध्यातरी केळीची साल इलेक्ट्रोनिक्स सर्कीटचा बारीक तुकडा आत ठेऊन हे केळं वस्तू बॅटरीवर चालणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
त्या इलेक्ट्रोनिक्समुळे केळ्याची चव बदलणार नाही याची तरतूदही डोल करेलच.

 

About the Author

novel reader's picture
novel reader