वसुंधरा दिवस

वसुंधरा दिवस 

सध्याची जीवनशैली अधिकाधिक ऊर्जेचा वापर, नव्याची हौस आणि सतत बदल अशी आहे. त्याचा शेवट उपकरणे आणि साधने यांचा अतिरेकी वापर यात होतो आहे. प्लास्टिकच्या वस्तू, बाटल्या, कागद व इलेक्ट्रोनिक कचरा दिवसेन दिवस वाढत आहेत. हवेतील प्रदूषण वाढते आहे. हे सर्व अर्थातच पर्यावरणाला धोकादायक आहे हे आपल्याला माहिती आहे. 
आपण राहतो ती जागा म्हणजेच पृथ्वी. पृथ्वी आणि एकूणात पर्यावरणाची उत्तम निगा आपणच राखली पाहिजे.  २२ एप्रिल हा दिवस सध्या 'अर्थ डे नेटवर्क'च्या विद्यमाने, जगभरातील तब्बल १९२ देशांमध्ये वसुंधरा दिवस( द अर्थ डे) म्हणून साजरा केला जातो. .   त्याची सुरुवात  १९७० साली झाली. एक सजग नागरिक म्हणून तुम्हाला सहज करता येतील अशा गोष्टी-

वाहन प्रदूषण कमी करणे
वाहन प्रदूषण हा पर्यावरणाला असलेला मोठा धोका आहे. ते कमी करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी.
किमान काही दिवस प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्र वाहन न वापरता लोकल वा बस अशा सुविधांचा वापर करावा. सायकल वापरावी व शक्य आहे तिथे चालत जावे. यामुळे वाहनामुळे होणारे प्रदूषण कमी होईल

कच-याचे नियोजन
ओला कचरा व कोरडा कचरा यांची योग्य विल्हेवाट व पुनर्वापर.  
रद्दीत टाकलेल्या व अनेक गोष्टी रिसायल करणे म्हणजे टाकलेल्या कच-यातल्या वस्तू पुन्हा वापरता येतील अशाप्रकारे त्यांची विभागणी करणे. अनेक ठिकाणी पेपरलेस बिलिंग असा पर्याय असतो तो स्वीकारा. कागदासाठी अनेक झाडे तोडली जातात. ते कमी करण्याचा प्रयत्न करू या. याउलट झाडे लावणे व त्यांची निगा राखणे असा उपक्रम करा.
 
ऊर्जेची बचत

विविध साधने, उपकरणे याचा योग्य आणि कमीत कमी वापर करता येईल असा एक दिवस तरी आठवड्यात ठेवावा. ऊर्जेची बचत ही नैसर्गिक संपत्तीची बचत आहे. 

पाण्याचा वापर
पाणी ही जीवनावश्यक बाब. त्याचा वापर काळजीपूर्वक करण्याची सवय लहान मुलांपासून सगळ्यांना शिकवा व आचरणात आणा. 

-साहित्यसंस्कृती

 

About the Author

साहित्यसंस्कृती