दिल का रिश्ता !

‘प्रेम’ हा विषयच किती evergreen आहे. लागतो कशाला प्रेमाचा एखादा दिवस...ते तर अंतरंगातून भरभरून वाहत असतं, रोजच...अगदी प्रत्येक क्षणी ! प्रेमाला वयाचं, जातीचं, धर्माचं कुठलंच बंधन नसतं. प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं. काळानुसार प्रेमाची व्याख्या, बदलत असावी का ? असा विचार करताना मला एकदम “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” मधले अनुपम खेर चे वाक्य आठवतात...

“मोहोब्बत का नाम तो, आज भी मोहोब्बत है बेटा !”

प्रेम व्यक्त करण्याची माध्यमे बदलली असली तरी भावना तीच, रंग मात्र वेगवेगळे...ते व्यक्तीनुसार, वयानुसार बदलत जातात; पण महत्वाची गोष्ट ही आहे की प्रेम उत्साह देणारं, प्रेरणा देणारं असावं.

मला नेहमीच असं वाटतं...

“दोन चांगल्या व्यक्ती, एक परिपूर्ण नातं निर्माण करू शकतात.”

त्यासाठी एकमेकांमध्ये आदर, विश्वास, समजूतदारपणा आणि निष्ठा असायला हवी. या चार गोष्टी टिकून राहिल्या किंबहुना या जबाबदारीपूर्वक दोघांनी टिकवल्या तर ‘प्रेम’ कायम राहतं...

प्रेम ही नकळतपणे निर्माण होणारी भावना आहे. ठरवून कधी कोणावर प्रेम होऊ शकत नाही. आपलं प्रेम असणारी व्यक्ती किंवा आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आयुष्याचा जोडीदार म्हणून मिळाली तर संसार आणि संपूर्ण आयुष्य सुखाचं होतं. याचा अर्थ दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती कधी भांडत नाहीत, त्यांच्यात मतभेद होत नाहीत, ते एकमेकांवर चिडत नाहीत असे नाही...भांडणातही गोडवा असतो. समोरच्याची मते, विचार समजून घेता आली पाहिजेत..चुकत असतील तर समजावून सांगता आली पाहिजेत. हे दोघांना जमलं की प्रेम दिवसेंदिवस मुरत जातं.

मला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती वाटते...तर दोघांमधलं strong communication. आपण दिवसभर सोबत असतोच असं नाही. अनेकदा एकमेकांपासून कितीतरी लांब राहत असतो. अशा वेळी एक ठराविक वेळ एकमेकांसाठी राखून ठेवायला हवा. आपण काय करतोय, दिवसभरातले अनुभव, विचार आपलं प्रेम असणाऱ्या व्यक्तीला सांगायला हवेत...त्यामुळे कधीही गैरसमज, वाद, भांडण होण्याच्या शक्यता राहत नाहीत.

प्रेम निभावण्यासाठी दोन्ही व्यक्ती अतिशय खंबीर असाव्या लागतात. अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की नाते निभावणे कठीण होऊ लागते. मग अशा वेळी दोघांपैकी कोणीही माघार घेतली तर नाते संपू शकते. आलेल्या अडचणी, आलेली संकटे एकमेकांना विश्वासात घेऊन, एकमेकांच्या सोबतीने दूर करायला हवीत.

यावर काही ओळी लिहिल्या होत्या...

नकोस देऊ कसली कारणे...

नकोत कुणाची उदाहरणे...

मी तुझी...

अन् तू माझा, फक्त हो...

इतकेच माझे साधे म्हणणे...

 

नको परिस्थितीला, शरण जाणे...

नकोच प्रेमाशी तडजोड करणे...

लढू सोबती...

अन् दोघे, एक होवू...

इतकेच माझे साधे म्हणणे...

 

आजच्या तरुण पिढीला नाते निभावता येत नाही असे दिसून येते. They don’t know how to hold the relation.

साध्य साध्य कारणावरून ह्यांचे so called ‘breakup’ होत असते. याची कारणे काय असावीत याचा निरीक्षणपूर्वक विचार करता काही गोष्टी लक्षात आल्या...Girlfriend/Boyfriend ही Concept प्रेमापेक्षा फार वेगळी आहे. मला एक girlfriend हवीय किंवा मला एक boyfriend हवाय ह्यात ‘प्रेम’ नसून ‘गरज’ जास्त असते. मग ती गरज भागवण्यासाठी available व्यक्तीबरोबर dating करायचं...मजा करायची...आणि कुठेतरी खटकलं की नातं संपवायचं.

इथे हे नाते enjoyment साठी जोडलेले असतं त्यामुळे त्यातली मजा संपली की नाते संपवायचे. त्यात वाढत्या social networking मुळे options खूप वाढलेत. मग एक नातं संपलं की ती रिकामी जागा भरून काढायला पुन्हा कोणीतरी शोधायचं...

आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा सुखात-दु:खात, संकटात त्याला आधार देणे, त्याच्या सोबत कायम उभं राहणं, त्याची काळजी घेणं ह्याला खरे प्रेम म्हणता येईल.

सांगायचे असे की....प्रेम तर कधी ना कधी सगळेच करतात. पण त्याहीपुढे जावून एकमेकांची सोबत करणं, एक चांगलं healthy, strong आणि सुंदर  नातं निर्माण करायला हवं...

  • अंजली दासखेडकर.

(anjali.daskhedkar@gmail.com)

अंजली इंजिनीयर असून कवयित्री आहे. अविस्मरणीय ही तिची आगामी कादंबरी लवकरच येत आहे. 

About the Author

अंजली दासखेडकर