आफ्रिकन लोककथा- खोटं न बोलणारा माणूस

आफ्रिकन लोककथा- खोटं न बोलणारा माणूस
एका गावात माहसेगॉ नावाचा एक माणूस राहत असे. तो कधीच खोटं बोलत नाही अशी त्याची ख्याती होती. दूर दूरच्या गावात राहणा-या लोकांनाही तो म्हणूनच ठाऊक होता.
एक दिवस राजाला त्याच्याविषयी समजले. राजाने त्याच्या सैनिकांना माह्सेगॉला राजवाड्यात घेऊन असे फर्मान काढले.
सैनिकांनी त्याला राजासमोर उभं  केलं.
राजाने त्याला विचारले," तू कधी खोट बोलला नाहीस हे खरं आहे का?"
माहसेगॉ म्हणाला, हो ते खरं आहे"
" तू तुझ्या आयुष्य़ात कधीच खोटं बोलणार नाहीस?"
माहसेगॉ म्हणाला,"मी कधी खोटं बोलणार नाही याबद्दल मला जराही शंका नाही"

काही दिवस निघून गेल्यावर राजाने पुन्हा त्याला बोलावले. खूप गर्दी जमली होती. राजा शिकारीला निघायच्या तयारीत होता. त्याचा एक हात घोड्याच्या आयाळीवर होता. डावा पाय रिकीबीत होता.
तो माहसेऑला म्हणाला," माझ्या  दुस-या राजवाड्यातल्या राणीला जाऊन सांग की दुपारच्या जेवणाला मी येईन. मेजवानीची तयारी करा. तूही त्या पंगतीला ये."
माह्सेगॉने वाकून सलाम केला आणि तो राणीकडे निघाला.
तो गेल्यावर राजा सर्वांना उद्देशून म्हणाला," आपण शिकारीचा बेत रद्द करू. आता माहसेगॉ खोटा बोलतो हे सिद्ध होईल. उद्या आपण त्याची मजा पाहू"
माहसेगॉ राणीकडे गेला. तिला म्हणाला," तुम्ही उद्या दुपारी मेजवानीचा मोठा बेत केला तरी चालेल, किंवा नाही केला तरी हरकत नाही. कदाचित राजा दुपारपर्यंत येईल वा येणारही नाही"
त्यावरी राणी म्हणाली," राजा येणार की येणार नाही ते सांग"

"महाराजांनी त्यांचा उजवा पाय रिकीबीत ठेवला की नाही ते मला माहिती नाही. वा मी तिथून निघाल्यावर त्यांनी त्यांचा डावा पाय जमिनीवर ठेवला का ते मला माहिती नाही."

प्रत्येकाने राजाची वाट पाहिली. दुस-या दिवशी राजा आला. राणीला म्हणाला ," कधीच खोटं बोलत नाही अशी ख्याती असणारा तो तुझ्याशी काल खोटं बोलला बघ."
त्यावर राणीने त्याला माहसेगॉ चे जे म्हणाले ते सांगितले.
माहसेगॉ कधीच खोट बोलत नाही  असं राजानं मान्य केलं. याउलट जेवढं स्वत:च्या डोळ्यानं पाहिलं तेच माह्सेगॉ सांगतो याची राजाची खात्री पटली

Category: 

About the Author

साहित्यसंस्कृती