धुळीचे कणही महत्त्वाचे

विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आपल्या समस्या, आपल्या सोयी, आपली आव्हाने सगळ्याच्या नोंदी विज्ञान घेत असत. अनेक कलाकार आणि शास्त्रज्ञ आपल्या जीवनातले घटक, त्यांचे परिणाम तपासत असतात. कलेतून संशोधनातून पुढे आणतात. एका संग्रहालयाच्या वेबसाईटवर अशीच एक महत्त्वाची बातमी पाहिली. ल्युसी नावाच्या एका आर्टिस्टने आपल्या सभोवताली असलेली धूळ संग्रहित केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे, काळचे धुळीचे कण तिने गोळा करून ते तपासले आहेत. त्यावरून मिळालेली माहिती संग्रहित केली आहे. या धुळीच्या कणांमध्ये ते सॅंपल जिथे घेतले तिथ असलेल्या घटकांची भौतिक माहिती मिळते, ती महत्त्वाची आहे असं तिच म्हणण आहे. इतकंच नाही तर सिरॅमिकवर ते धुळीचे सॅपल चिकटवून ती भांडी तिनं अभ्यासाकरता मांडली आहेत.
आपण ज्याला घाण आणि त्रासदायक गोष्ट समजतो ती धूळ आपले पर्यावरण आणि आपले दैनंदिन जीवनातले घटक कसे आहेत त्याचा आरसा आहे असं या कलाकाराचं म्हणण आहे.

पुढील दुव्यावर तिचा प्रयोग पाहता येईल, त्याविषयी अधिक माहिती मिळेल.

photo credits- lucie libotte

About the Author

techsavvy