भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम

भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

शिलाँगमधील आयआयआयएममध्ये जाहीर कार्यक्रमात भाषण करत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.

राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतरही देशभरातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक व हजारो तरुणांना मार्गदर्शन करणा-या कलाम यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. केंद्र सरकारने अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

आयआयएमच्या विद्यार्थ्यांना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास व्याख्यान देत असताना ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने बेथनाय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती मेघालयचे मुख्य सचिव पी. बी. ओ वरजिरी यांनी दिली.

कलाम यांचे पार्थिव मंगळवारी गुवाहाटीवरून दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्याबाबत केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांच्याशी मेघालयचे मुख्य सचिव पी. बी. ओ वरजिरी यांनी चर्चा केली. केंद्र सरकारने अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

२००२ ते २००७ या काळात कलाम हे राष्ट्रपती होते. नामवंत शास्त्रज्ञ असलेले कलाम हे भारतीय अंतराळ व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे उद्गाते होते.

साहित्यसंस्कृती परिवारातर्फे त्यांना मानाचा मुजरा.

About the Author

admin's picture
admin