उपयुक्त अ‍ॅप्स- क्रिएटिव्ह व्यक्तीकरता

डिजिटल युगात गोष्ट कशी सांगाल?

सुटी असली की मुले विविध वर्कशॉप्स करतात, शिबिरांना जातात. मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडतील अशा काही सोप्या अ‍ॅप्सची माहिती आम्ही खास तुमच्या करता देतो आहोत. चित्रे, फोटो आणि सर्जनशील मंडळींना ती नक्कीच आवडतील.

मॅपस्किप
इथे विनाशुल्क अकाउंट काढता येते. आपल्या आयुष्यातल्या विविध घटना कुठे घडल्या त्या विविध गावांना, शहरांना गुगल मॅपने जोडता येते. फोटो आणि घटना अशाप्रकारे एकत्र करून सर्व सदस्य त्याबद्दल मत व्यक्त करू शकतात. नकाशे आवडत असतील, नकाशांचा उपयोग कसा करायचे ते शिकायचे असेल तर हे अ‍ॅप आवडेलच. शिवाय गोष्ट लिहायची असेल तर हे सर्व एकत्र शिकण्याची ही उत्तम संधी आहे.www.mapskip.com

पिक्सटन
लहान मुलांना स्वत:ची कॉमिक्स तयार करायची असतील तर हे उत्तम अ‍ॅप आहे.
गोष्ट लिहा, चित्रे काढा आणि कॉमिक्स तयार करा. जवळजवळ एक मिलियनपेक्षा अधिक यूजर्स असलेले हे अतिशय लोकप्रिय अ‍ॅप आहे. व्यक्तिगत उपयोगाबरोबरच शाळा तसेच इतर व्यावसायिक पद्धतीने जर कॉमिक्स करायची असतील तर त्याकरता विविध पर्याय विकत घेण्याची सोय आहे. 

वुईव्हिडियो
तुमचे फोटो, व्हिडियो वा ऑडियो क्लिप्स एकदा अपलोड जरा आणि हवे तेव्हा ते हाताळा. एकच फोटो विविध ठिकाणी वापरू शकता. वेगवेगळ्या प्रसंगांचे, घटनांचे व्हिडियो तयार करण्यासाठी हा एक मस्त क्लाऊडबेस प्लॅटफोर्म आहे. ते फेसबुस वा इतर सोशल मेडियावर शेअर करण्याची सोय सुद्धा यामध्ये आहे. त्याशिवाय याचा एडिटर एक उत्तम डेस्कटॉप एडिटर आहे असे हे सोपे आणि वैशिष्ट्यपूर्ण अ‍ॅप आहे.
विनाशुल्क व्यक्तिगत आणि त्याशिवाय तसेच व्यावसायिक स्वरूप असलेले विविध पर्याय वेगवेगळ्या किमतींत उपलब्ध आहेत. 

About the Author

वेब_टीम_साहित्य