असा साजरा करा -वसुंधरा दिवस

२२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस.

मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या र्‍हासाकडे लक्ष वेधले जावे म्हणून अमेरिकेतील एका गटाने २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा करण्याची प्रथा १९७० मधे सुरू केली. आता जगभर हा दिवस ’जागतिक वसुंधरा दिन’ (World Earth Day) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त्याने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन होईल याकरता जगभर विविध उपक्रम राबवले जातात. 
रिसायकल आणि रियूज ही दोन महत्त्वाची तत्त्वे संवर्धनासाठी वापरली जातात. 

  • झाडे लावा, झाडे जगवा
  • कंपोस्ट करणे, ओला कचरा आणि सुका कचरा या योग्य विभागणी करणे. 
  • अनावश्यक वस्तू न घेणे, जे वेगवेगळ्या रूपात पुन्हा वापरता येतील ते वापरणे. 
  • कागद, काचेच्या बाटल्या, प्लास्टीक या कच-यासाठी वेगळी हाताळणी करणे 
  •  वाहतूकीची सार्वजनिक साधने वापरणे 
  • जिथे शक्य तिथे सायकल/ पायी चालणे
  • प्लास्टीक पिशव्यांचा कमीत कमी वापर

ही काही साधी तत्त्वे आपण स्वीकारणे आवश्यक आहे. त्याकरता जीवनशैली बदलणे गरजेचे आहे. 

२२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस- यानिमित्त्याने ​ वरील पैकी ​किमान एक उपक्रम सुरू करा आणि राबवा.

निर्सगातून मिळणारी खनिजे ही अमर्यादित बाब नाही. त्याविषयी डोळस विचार आणि कृती अपेक्षित आहे. ऊर्जेचे विविध पर्याय शोधणे आणि वापरणे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.​
साहित्यसंस्कृतीवर पर्यावरण व त्याचे संवर्धन यावर आधारित लेखनाचे दुवे-

 अमन की आशा
आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
सोपी नाही ती स्वच्छता

काही उपयुक्त वेबसाईटस

  1. रेल्वेने जगभर प्रवास करण्याची माहिती
  2. कागद, कापड, काचेच्या वस्तू, प्लास्टिक, धातूच्या वस्तूंचे काय कराल?
  3. वापरलेले कपडे, भांडी, खेळणी अशा नकोश्या वस्तू, नकोसे फर्निचर, वापरात नसलेल्या इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तू याचे तुम्ही काय करता?​​​  तुम्ही राहता त्या शहरासाठी असे यूज आणि रियूज चे काय तयार कराल?

आपल्या घराची, आपल्या निर्सगाची, धरतीची आणि पर्यावरणाची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक दिवस वसुंधरा दिवस असतो हे मनात ठेवा आणि जागरूकपणे वागा अशी विनंती.

-साहित्यसंस्कृती

कविता/ लेखन पाठवण्यासाठी पत्ता-eksakhee@gmail.com

 

About the Author

साहित्यसंस्कृती