प्रश्न

प्रश्न कुठला साबण लावुन झाडे चकचकती

क्रीम कोणते लावुन पाने तुकतुकती

फुले कोणते अत्तर लावुन दरवळती

फूलपाखरे टॅटू कोठुन गोंदवती

कुठला शॅम्पू भालूच्या केसांसाठी

पेस्ट कोणती हत्तीच्या दातांसाठी

चहा पिउन कुठला वारे ताजे होती

कुठले असते व्हिटॅमीन सूर्यासाठी

प्रश्न मला दररोज किती हे पडपडती

आई, बाबा, ताई डोके खाजवती

- ग्लोरी

About the Author

admin's picture
admin