अशीही भन्नाट एटीएम मशीन्स

मध्यरात्री चहा प्यावासा वाटला, पिझ्झा, बटाटे वडा वा चिकन नगेटस खावेसे वाटले तर तुम्ही काय करता? घरी हे पदार्थ तयार आहेत त्यांचे जाऊ द्या. जवळ एखादे दुकान वा टपरी नसेल तर? दुकाने बंद असतांना या वस्तू २४*७ मिळाल्या तर काय मजा येईल असे मनात येते का? जसे एटीएम(Automatic Teller Machines)मधून बॅंक बंद असतांना कॅश मिळते तसे या पदार्थांचे झाले तर? नुसती कल्पना सुद्धा किती छान वाटते. ही कल्पना प्रत्यक्षात आलेली आहे. कशी एटीएम आता मोठ्या शहरांबरोबर लहान मोठ्या गावोगावीही आहेत तसा वेंडिंगमशीनचा वापरही वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगात या एटीएम मशिन्सचा वापर जगभरात फक्त चलनी नाणी/ नोटा बॅकेतून घेण्यासाठी नाही तर इतर वस्तू विकण्यासाठी होतो. थोडक्यात एखाद्या वेंडिग मशीनचे काम  हे एटीम काम करू शकते. जगभरात अशी आधुनिक एटीएम्स वापरांत आहेत.
न्यूयॉर्क मधली ही काही एटीएम्स पहा.
बिअर, कप केक्स शिवाय चक्क सायकल भाड्याने देणारे एक एटीम आहे!पॅरीसमध्ये असे एक खास ब्रेड विकणारे एटीएम आहे.

 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह