बर्फाळ प्रदेशातले जीवन

उत्तर आणि दक्षिण धृवावर राहणारे प्राणी त्या थंडीला, बर्फाला आणि थंडगारा वा-याचा सामना करायला समर्थ असतात. त्यांची शरीररचना तशीच असते. अंगावर खूप दाट केस, चरबीचे खूप जास्त प्रमाण आणि त्यांच्या पंज्याची नखे पोलर अस्वल, आर्टिक कोल्हा आणि वॉलरस या प्राण्यांना त्या प्रदेशात राहण्यास मदत करतात.

वॉलरसच्या शरीराचे तापमान खूप वाढले तर काय होते माहिती आहे?

त्याच्या कातडीचा रंग गुलाबी होतो.! त्वचेजवळचा रक्तप्रवाह वाढतो. म्हणून त्वचा गुलाबी दिसते. हा प्रवाह वाढल्यामुळे शरीरातून उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. अशारितीने वॉलरसचे तापमान कमी होते.

About the Author

साहित्यसंस्कृती