एक लहानसा बदल करू या

 

एक  लहानसा​ बदल करू या
आपल्या जीवनशैलीत एक छोटा बदल केला तरी खूप काही घडू शकते असे मला जाणवले आहे. कोणतेही मोठे काम आपण तुकड्यात विभागले की करणे सोपे जाते. बदलांचे सुद्धा असेच आहे.

एक एक बदल केला तरी त्याचे परिणाम खूप चांगले असू शकतात.
लहान बदलातून खूप काही मोठे बदल साध्य होऊ शकतात.
एका बदलातून मोठे बदल होत जातात आणि एकंदर जगणे समृद्ध होऊ शकते
उत्तम तब्येत, चांगले अर्थाजन आणि विनियोग यामुळे तणाव कमी होतो. तणाव कमी झाल्याने नोकरी घर आणि सर्वच ठिकाणी  जबाबदा-या नीट पार पाडता येतात

कोणते  बदल करता येतील?
पुढीलपैकी एक पर्याय निवडून सुरूवार करू या.

लवकर उठणे व लवकर झोपणे

मोबाईल/ सोशल मिडियाचा रात्रीचा १० मिनिटे वेळ कमी करा, झोपा. व दुस-या दिवशी दहा मिनिटे लवकर उठा. शांत झोपेची गरज आणि ती मिळणे ही आरोग्याची पहिली पायरी आहे.

ध्यान करणे

एका जागेवर बसून ध्यान करण्याचा प्रयत्न करू या. सुरुवात अगदी ५ मिनिटापासून करू या.

एखादा व्यायाम सुरू करावा

अगदी १५ मिनिटे चालणे, धावणे, सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या मारणे यातली एक वा वेगवेगळी गोष्ट करू या. त्यापुढे वेळ हळूहळू वाढवता येईल.

घरातली, ऑफिसातली रद्दी काढण्याची सवय करा

नको असलेले कपडे, वस्तू, कागद, पुस्तके, पेपर्स , चपला बूट इत्यादी सर्व वस्तू सेवाभावी संस्थांना वेळीच द्या वा त्याची विल्हेवाट लावा. कमी पसारा तेवढे त्याचा व्याप आटोक्यात राहील.

मनात येणारे निराशावादी विचार झटकून त्याऐवजी एखाद्या उपकाराचे स्मरण करावे

 जागरूक राहिले तर दिवसभर जे घडले नाही, जे काही वाईट घडले ज्याचा त्रास झाला अशा गोष्टी आपण मनात घोळवत राहतो. त्या  न आठवता एखादा चांगला प्रसंग, चांगली आठवण वा कुणी केलेल्या उपकराचे स्मरण करून सुद्धा दिवस पुढे नेता येईल. ही सवय अंगवळ्णी पडू द्या. त्याने समाधानी होता येते, आयुष्यावर खूप चांगला परिणाम होतो.

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह