एका जारमध्ये जेवण

काहीजण फक्त प्रथिने खायचे ठरवतात. विविध कडधान्ये भिजवून, काहींना मोड आणून, काही त्यानंतर थोडेसे शिजवून आपण ही कडधान्ये खाऊ शकतो. चवळी, मटकी, मूग, चणे, राजमा अशा कडधान्यांचे जार आवडीप्रमाणे करता येतील. विविध रंगाची फळे,भाज्या व धान्य खाण्यावर भर द्यावा असे म्हणतात. त्यानुसार हे जार तयार करता येतात. त्यांना घट्ट झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवता येईल. लिंबू, व्हिनेगर, मिरे, धनेपूड आणि विविध ड्रेसिंग ऐनवेळी घालून हे खाता येईल. जारमध्ये शक्यतोवर गरम पदार्थ भरू नका.

salads खाण्याची पद्धत सर्वमान्य झाली आहे. एखाद्या दिवशी बदल म्हणून पूर्ण जेवणही salads/सलाडच घेणार अनेकजण असतात. काही जण वजन कमी करण्याचा खात्रीशीर उपाय म्हणून salads खाणेच पसंत करतात. विविध प्रकारचे सलाड एका जारमध्ये करून ठेवले, ते फ्रीजमध्ये ठेवले की झाले. एक एक जार काढून तोच डबा म्हणून जेवणाकरता वापरता येईल असा एक ट्रेंड सध्या दिसतो. खालील व्हिडियोमध्ये सलाडचे वेगवेगळे प्रकार दिले आहेत. एका जारमध्ये करून ठेवायला आणि वापरायला खूपच सोपे. चविष्ट सलाडचे हे व्हिडियो न चुकता पहाच!

About the Author

admin's picture
admin