2018 FIFA world cup- फ्रान्सला दुसऱ्यांदा जगज्जेतेपद

2018 च्या FIFA वर्ल्डकप वर फ्रान्सने आपले नाव कोरले आहे.

२०१०नंतर  ब्राझिल, जर्मनी, इटली किंवा अर्जेंटिना यापैकी कुणीच वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये नाही असे प्रथमच झाले आहे. २०१०मध्ये फुटबॉल वर्ल्डकपची फायनल रंगली होती ती स्पेन आणि नेदरलँड यांच्यात. अर्जेंटिना आणि उरुग्वे यांच्याप्रमाणे वर्ल्डकप दोनदा जिंकण्याची संधी फ्रान्सला मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. १९९८मध्ये फ्रान्सने वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी फ्रान्सचे नेतृत्व होते ते दिदर डेसचॅम्पकडे अन् आज तेच फ्रान्सच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने जगज्जेतेपद पटकावले तर खेळाडू आणि मॅनेजर म्हणून देशाला जगज्जेता करणारे ते तिसरे खेळाडू ठरले आहेत. याआधी मारियो झॅगलो आणि फ्रान्झ बेकेनबॉर यांनी हा पराक्रम केला आहे.

  • फ्रान्सच्या ग्रिझमनने 'पेनल्टी'वर गोल नोंदविला. आतापर्यंत झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनलमधील ही पाचवी पेनल्टी ठरली. आतापर्यंतच्या पाचही 'स्पॉट-किक'वर गोल झाले आहेत. यापूर्वी, २००६ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये फ्रान्सच्या झिनेदिन झिदानने इटलीविरुद्ध नोंदविला होता. 
  •  क्रोएशियाच्या मांझुकिचकडून स्वयंगोल नोंदला गेला, हा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये नोंदला गेलेला पहिलाच स्वयंगोल ठरला. 

ग्रिझमन, पॉल पोग्बा आणि किलियन एम्बापे यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने अंतिम लढतीत क्रोएशियावर ४-२ ने मात केली.

आतापर्यंत ज्या-ज्या सामन्यात ग्रिझमनने गोल नोंदविला, त्यात फ्रान्स संघ हरला नव्हता, तर दुसरीकडे गेल्या तीनही सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर क्रोएशियाने बाजी मारली होती. या वेळीही तशाच कामगिरीची पुनरावृत्ती क्रोएशिया करणार का, याबाबत औत्सुक्य वाढले होते. पण यावेळी ते घडले नाही.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूला 'ग्लोडन बूट' देऊन गौरविण्यात येते. या वेळी इंग्लडचा हॅरी केन 'गोल्डन बूट'चा मानकरी ठरला.

About the Author

admin's picture
admin