
गेले काही दिवस जालावर लेखन, वाचन यातून समाजभान, बौद्धिक क्षमता आणि यशस्वीतेची चाचपणी होत होती. आपल्याला तुलना केल्याशिवाय, स्पर्धा केल्याशिवाय जगता येत नाही का असे वाटते. एकमेकांना धर्म जात आणि राजकीय आवडनिवड याच्या निकषांकवर जोखणे हे सुद्धा नवीन नाही. समाज एक होण्यापेक्षा त्यात दुही कशी राहील हेच तर या स्पर्धेचे अंतिम ध्येय होते! हा जगण्याचा, आयुष्याचा नेमका अर्थ काय आहे? कोणता खेळ आहे आयुष्य म्हणजे? काय आहेत त्याचे नियम, निकष? हा व्हिडियो नक्की विचार करायला लावेल.
Category: