व्ही.एस. नायपॉल यांचे निधन

अ बेंड इन द रिवर या कादंबरीमुळे असेल पण एकंदरीतच  व्ही.एस. नायपॉल हे साहित्य क्षेत्रातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. लेखकाच्या पत्नीने दिलेल्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या  वृत्तानुसार नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाचे त्यांच्या लंडन येथील घरी शनिवारी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.

व्ही.एस.नायपॉल यांचा  जन्म त्रिनिदाद  येथे झाला होता.1961 सारी प्रकाशित झालेली House For Mr BIswas ही नायपॉल यांची कादंबरी त्यांच्या वडिलांच्या जीवनावर आधारित होती. त्या कादंबरीत त्यांनी त्रिनिनाद आणि तेथील आयुष्य याबद्दलचा त्यांचा स्वतःचा एक दृष्टिकोन मांडला होता. न्यू यॉर्कर मासिकाचे प्रसिद्ध समीक्षक जेम्स वूड यांनी ही कादंबरी अतिशय विनोदी आहे. त्यात अनेक हळुवार प्रसंग ,  बारीकसारीक तपशील आहेत असे विधान केले होते. ती  त्रिनिदाद या बेटावरची  उत्तम कविताच आहे असे ते म्हणाले होते.

ऑक्सफर्ड ला शिक्षणासाठी गेल्यानंतर नायपॉल त्यांना जे  अनुभव आले त्यामध्ये वर्णद्वेषाचा समावेश होता.त्यामुळे त्यांच्या मनात विखार होता ,दुःख होते चीड होती.सुरुवातीच्या काळात त्यांना अतिशय एकटे वाटत होतं.

"वेस्ट इंडिजमध्ये असतांना भारतीय, इंग्लंडमध्ये असतांना वेस्ट इंडियन आणि बौध्दीक क्षेत्रात कोणताही आधार नसलेला उपरा अशा आपल्या ओळखीने त्यांच्यातील लेखक संभ्रमात पडला. याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उमटले. यानंतर त्यांनी जगप्रवास केला. आपली मायभूमी भारतासह जगाच्या विविध भागांना भेट देऊन त्यावर आधारित पुस्तकांनी जागतिक साहित्यात खळबळ माजवली. साहित्यक्षेत्रात पाश्‍चात्य जग व अमेरिका यांचेच वर्चस्व असतांना त्यांनी पृथ्वीवरील मागास राष्ट्रांचे अत्यंत सडेतोडपणे विश्‍लेषण केले. यातून अगदी त्यांचा मूळ देशही सुटला नाही. ‘ऍन एरिया ऑर्फ डार्कनेस’, ‘वुंडेड सिव्हीलाझेशन’ आणि ‘मिलियन म्युटीनीज नाऊ’ या ग्रंथ-त्रयीने भारतीयत्वाची अक्षरश: चिरफाड केली. भारतात आध्यात्मिकतेला दिलेले अवास्तव स्थान, अंतर्मुख प्रवृत्ती, स्त्रैण विचारधारा हेच या महान संस्कृतीच्या पतनाला कारणीभूत कसे ठरले याची अत्यंत तरल पण परखड मीमांसा त्यांनी केली. प्रखर तर्कशक्ती, अफाट बौध्दिक विलास आणि विलक्षण तटस्थपणा यामुळे भारताचे बाहेरील लेखकाने केलेले सर्वश्रेष्ठ मूल्यमापन म्हणून या तीन ग्रंथांची गणना करण्यात आली. कारकिर्दीच्या प्रारंभी नर्मविनोदाचा शिडकाव असणार्‍या त्यांच्या प्रसन्न शैलीने नंतर गंभीर पण वैचारिक वळण घेतले." -शेखर पाटील , ब्लॉगर.

या सगळ्या अनुभवांचा परिणाम. त्यांच्या लेखनावर झाला.  त्यांनी ऑक्सफर्ड मधून त्यांच्या घरी  त्रिनिदादला जी काही पत्र पाठवली  ती पत्रे 2000 साली प्रकाशित करण्यात आली.

 त्यांच्या लेखनात गुलामगिरी ,वसाहतवाद संदर्भ आणि त्याविषयी उलटसुलट मते येतात.  त्याचाच परिणाम म्हणून कधी भारताविषयीची आपुलकी, कधी भारतीय मूळ असल्याविषयीची चीड,कधी इंग्लंड विषयीचा राग दिसतो. बायकांविषयी  जुनाट आणि  पारंपरिक  मते  त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहेत. अशी अनेक पूर्वग्रहदूषित मते त्यांच्या लेखनातही दिसून येतात.

India: A Million Mutinies Now, या पुस्तकात त्यांनी 1990 च्या आर्थिक बदलांपूर्वीच  बदलत्या भारताचे चित्र रेखाटले होते.

 जेम्स वूड यांच्यामते  ही सर्व पत्रे व त्यांचे लेखन  पूर्वग्रहदूषित  दृष्टिकोनामुळे एकंदरीत व्यक्तीगत, खाजगी स्वरूपाचे आहे असे वाटते. त्यामध्ये  इतरांना  काय सापडते आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

रवींद्रनाथानंतर ‘नोबेल’ मिळवणारे ते एकमेव भारतीय वंशाचे लेखक आहेत.

पुस्तके सदर्भ-विकिपीडिया
Fiction

Non-fiction

About the Author

साहित्यसंस्कृती