अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

 भारताचे माजी पंतप्रधान,  साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख  असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या भाषणांसाठी प्रसिद्ध होते. ​

त्यांनी पंतप्रधान असताना घेतलेले महत्त्वाचे काही निर्णय -
 
 
साऱ्या जगाला चकवा देऊन घेतली अणु चाचणी
11 आणि 13 मे 1998 रोजी पोखरणमध्ये पुन्हा अणु चाचणी करण्यात आली. त्यावेळी अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने भारतावर नजर ठेवण्यासाठी पोखरणवर एक सॅटेलाइट सुद्धा लावले होते. परंतु, भारताने या अमेरिकन सॅटेलाइटला चकवा देत अणु चाचणी घेतली.  त्याच दरम्यान अणुऊर्जेचा वापर फक्त विकासासाठी राहील. त्यातून शस्त्र बनवली जाणार नाहीत असे वाजपेयींनी स्पष्ट केले होते.
 
 
14 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार, सर्व शिक्षा अभियान
अटल सरकारमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'सर्व शिक्षा अभियान' 2001 मध्ये सुरू करण्यात आले. यामध्ये 6 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात आली. सोबतच, शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला.
 
 
कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली
पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफांनी भारत-पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या जमीनीवर ताबा मिळवला. यावरूनच अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसेच आपल्याला युद्ध नको असेही समजावून सांगितले. तरीही पाकिस्तानने वाजपेयींच्या बोलण्यावर दुर्लक्ष केली. त्यामुळेच, भारत आणि पाकिस्तानात कारगिल येथे युद्ध पेटले. 26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराला कारगिल युद्धात पराभूत केले.
 

अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता

मौत की उम्र क्या, दो पल भी नही
जिंदगी सिलसिला, आज कल की नही
मै जी भर जिया, मै मन से मरू
लौटकर आउंगा, कूच से क्यूं डरू 
तू दबे पांव, चोरी-छिपे से न आ
सामने वार कर, फिर मुझे आजमा 
मौत से बेखबर, जिंदगी का सफर 
शाम हर सुरमइ , रात बंसी का स्वर

-अटल बिहारी वाजपेयी

 

झाले बहू होतील बहू परंतु या सम हाच! वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 
image credit- wikipedia
 

About the Author

साहित्यसंस्कृती