भयकथा

भयकथा लेखक- उत्पल 
निवेदन- धीरेश जोशी 

किल्ले राजगड. महिना जून. सकाळचे साडेआठ. पावसाचा पुण्यात पत्ता नाही म्हणून विशेष तयारीने न आलेल्या आम्हा तिघांना (म्हणजे मी आणि काव्य-शास्त्र-विनोदवाले दोन मित्र) पायथ्याशीच पाऊस चांगला दणका देतो. पाली दरवाजाकडून आम्ही चढायला सुरुवात करणार असतो. पायथ्याच्या गावातल्या छोट्या हॉटेलमध्ये पोहे चापत असताना जो पाऊस सुरू होतो तो आम्हांला आवंढा गिळायला लावणारा असतो. पण चहा होईपर्यंत जोर जरा कमी होतो आणि आम्ही चढायला सुरुवात करतो. राजगडाला ही दुसरी भेट. गड अर्थातच लाजवाब. राजधानी शोभावी असाच. ऐसपैस शब्दाला पन्नासने गुणावं असा ऐसपैस. चढताना पाऊस फार लागत नाही.

पुढे काय होत? माणसे का घाबरतात? भीती वाटणं चांगल की वाईट? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ऐका! भयकथा!

 

Price: 
$0.99

About the Author

साहित्यसंस्कृती