भारतातील इस्लामी वसाहतवाद

जगातील कोणत्याही टोळ्या किंवा धार्मिक उद्देश ठेवून झालेली आक्रमणे ही फक्त युध्दा पुरती मर्यादित न राहता ,त्या मागे त्या आक्रमकांचा राज्यविस्तार हा मूळ हेतू असल्यामुळे मध्ययुगाच्या सुरुवातीस जगभर जेव्हा अरबांनी पश्चिमेस स्पेन पासून पूर्वेला इंडोनेशिया पर्यंत जी आक्रमणे केली त्यात फक्त लूटा लूट हा उद्देश नव्हता .ज्या प्रमाणे ब्रिटीशांनी जगभर व्यापाराच्या निमित्ताने आपल्या वसाहती उभारल्या त्या प्रमाणे अरबांनीही आपल्या वसाहती जगभर उभारल्या असाव्यात का ? हा मला प्रश्न पडला होता.
याला निमित्त होतं Muslim political thought And Administration या Haroon khan यांच्या पुस्तकाचं.

मुहम्मद पैगंबरांच्या काळातच संपूर्ण अरेबिया इस्लाम च्या झेंड्याखाली आणण्याचं काम संघटित झालेल्या पूर्वाश्रमीच्या भटक्या अरबी टोळ्यांनी केलं.
त्या पुढच्या 4 खलिफांच्या काळात तर ते आक्रमण पश्चिमेस स्पेन व पूर्वेस अफगाणिस्थाना पर्यंत पसरले होते. या जिंकलेल्या साम्राज्यात अरबी टोळ्यांनी अत्यंत काटेकोर नियम बनवत आपआपल्या वसाहती बनवल्या. उदाहरणार्थ --- बसरा,बगदाद भागातील लोक हे अली धार्जिणे असल्या मुळे शिया राहीले आणि सिरीया ,इजिप्त कडे असणार्या टोळ्या सुन्नी राहिल्या मुळे ते देश आजही सून्नी पंथीय आहेत .
या टोळ्यांनी अरबस्तान सोडून या इराण ,इराक,इजिप्त,सिरीया सारख्या पर्शियन ,रोमन ,इजिप्शियन संस्कृती असलेल्या देशात वसाहती केल्या नंतर त्यांचं अरबी शुध्दपणा आणि कडवेपणा टिकवून ठेवण्यासाठी स्थानिकांशी वैवाहिक संबंध निषिद्ध ठरवले गेले तसेच इतर सर्व व्यवहार निर्बंध घालून त्यांनी आपलं आरबी पण टिकवून ठेवलं !

भारतामधे सुध्दा असंच झालं असेल का ?असा प्रश्न मला पडला .कारण मुसलमानांनी भारतात आक्रमण केल्या नंतर त्यांनी शेकडो वर्षे स्थानिकांना सैन्यात आणि प्रशासनात कोणतेही स्थान दिले नव्हते यामुळे भारतासारख्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करण्यासाठी त्यांना ठरवून वसाहती निर्माण कराव्या लागल्या असाव्यात असे दिसते याचे उत्तर
" सिंधची ची दर्दभरी कहाणी" या - के.आर मलकानी या लेखकाने लिहलेल्या पुस्तकात पान क्र ६८ नुसार पुढील माहिती मिळते--- 
" राजा दाहिर चा पराभव केल्यानंतर सिंध मधे अरबांच्या वेगवेगळ्या वस्त्या तयार करण्यात आल्या.ते आपल्या प्रमुखांच्याच आज्ञा पाळत असत .अशा वसाहती ब्राह्मणाबाद म्हणजेच आजचे सिंध मधले हैदराबाद आणि मन्सूराबाद येथे मोठ्या अरबी वासाहती होत्या ,त्यांचे कायदे ,चालीरिती या अत्यंत क्रौर्यपूर्ण असत,कडव्या आणि स्थानिकांपेक्षा वेगवेगळ्या असत."

दुसरा संदर्भ या विषया बाबतीत मला Advanced study in the History of medival india या जे.ल.मेहता लिखित पुस्तकात पान क्र ९७ वर इल्तमश सुलतान काळातील पुढील प्रमाणे आहे -
" He encouraged the muslim to make settlements in the Hindu habitats, particularly , in the mountainous and forest regions " 
- तत्कालीन संदर्भ देऊन लेखकाने स्पष्ट केले आहे की सुलतान इल्तमश ने मुस्लिमांना भारतात जंगल आणि डोंगराळ भागात वसाहती करायला प्रोत्साहन दिले होते.

अल्लाउद्दीन खिलजीचं उदाहरण तर सर्वांना माहित आहे,देवगिरीच्या मांडलीक राजाने वेळोवेळी खंडणीला वेळ लावल्यामुळे आपलीच माणसे त्याने या भागात नेमली आणि हळूहळू हिंदू राज्यकर्ते बाजूला पडले याच देवगिरीला मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वसाहत असायला हवी कारण अनेक संशोधकांच्या मते विजनगरच्या राजाने दौलताबादला मोठ्या प्रमाणावर लढाईत मुस्लिमांची कत्तल केली याचाच परिणाम होऊन पाचही शाह्या एक होऊन विजनगर वर चालून गेल्या.

भारतात ठिकठिकाणी मुस्लिमांच्या झालेल्या वसाहती या त्यांच्या राज्यकारभार सुरळीत राखण्यासाठी कारणीभूत होत्या म्हणूनच सुरुवाती पासूनच त्यांनी अशा वसाहतींना प्रोत्साहन दिल्याचं समोर येतं,परक्या मुलखात आपल्या रक्ताची,धर्माची माणसं ठिकठिकाणी असणं हे दिर्घकाळ राज्य टिकवण्याचा उपाय उत्तम आहे, परंतु या विषयावर अधिक सखोल संशोधन होणं गरजेचं आहे .उत्तर काळातही भारतात पश्चिमेकडील आक्रमक टोळ्यांच्या वसाहती होत राहिल्या त्यातली सर्वात अलिकडची टोळी म्हणजे पानिपत युध्दा आधी भारतात आलेल्या रोहिला पठाण टोळीच्या वसाहती.या सर्व वसाहतींमधे शेवट पर्यंत लग्न संबंध बाहेरील म्हणजेच धर्मांतरीत मुस्लिमांशी टाळण्याचा आणि स्वतःच्याच वंशातील , टोळीतील लोकांशी बेटीव्यवहार चालू असल्याचे दिसते या मागे वंश शुध्दी राखणे, स्वतः च्या वंशाचा अभिमान आणि धर्मांतरीतांचा वंश कमीतला मानने ही प्रमुख कारणे वाटत आहेत. यामुळे दरबारामधेही उमराव ,न्याय खात्यातील मौलवी ,सैन्यामधे सेनापती व इतर प्रमुख पदी विदेशी परंतु स्वतः च्या वंशीयांनाच प्राधान्य दिल्याची उदाहरणे सापडतात.

प्रणव पाटील

About the Author

Pranav Patil's picture
Pranav Patil