
होवो होवो सृष्टी दृष्टीआड! लेखक- सतीश तांबे कथाकथन- अनुपमा ताकमोगे
अशाच बोलण्याबोलण्यातून आजोंनी तिला अगदी लहान वयातच दृश्यातले रंग, फोटोग्राफीचे अॅंगल, संगीत अशा अनेक गोष्टींमधे गोडी निर्माण केली. आज मोठं झाल्यावर विदिशाला हे कळतं की, आजोंना चित्रपटाच्या तंत्राची माहिती यथातथाच होती. परंतु तरीही तिच्या आसपासचे लोक कोणत्याही चित्रपटाबद्दल बोलतांना जसे कथा, गाणी, अभिनय, फार तर दिग्दर्शन इथपर्यंतच चघळत बसायचे तसं आजोंचं नव्हतं. त्यामुळेच आजोंच्या बोलण्यातून तिला चित्रपट कसा बघायचा असतो ह्याची दृष्टी तर मिळालीच, शिवाय वय वाढता वाढता चित्रपट बनवायची स्फूर्तीही मिळाली. (फोटो- सुमुखी पेंडसे संरचना- शैलेश गर्दे)
Price:
$1.99
Category: