
काश्मीर-वाजपेयी पर्व
प्रस्तुत पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण या पुस्तकाचे लेखक ए.एस.दुलत हे भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW चे माजी महासंचालक होते तसेच या आधी ते काश्मीर राज्याचे आय.बी.प्रमुख होते... पंतप्रधान वाजपेयी यांच्या काळात ते पंतप्रधानांचे काश्मीर विषयाचे सल्लागार म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांनी पुस्तकामधे दिलेली उदाहरणे,वस्तुस्थिती ही अतिशय विश्वासार्ह आहे .....अनेक वर्षे काश्मीर मधे काम केल्या नंतर त्यांनी भारतीय विमान अपहरण असो,मुफ्ती सईद यांच्या मुलीचं अपहरण ,कारगीलची लढाई असो अशा अवघड तणावग्रस्त वातावरणात जीथे आय.बी.च्या अधिकार्यांना वेचून वेचून ठार मारलं जात होतं त्या काळात सगळे भारतीय प्रशासकीय अधिकारीही काश्मीर सोडून पळून जात होते या काळातही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला....
दुलत यांच्या मते काश्मीरींशी कायमस्वरुपी संवाद साधत राहणे हाच एकमेव उपाय आहे यामुळे सीमेपलिकडे गेलेल्या अनेक दहशतवाद्यांचं परिवर्तन घडून आलं आणि ते मुख्यप्रवाहात आले...परंतु दिल्लीत बसलेल्या नेत्यांना काश्मीरियतची नसलेली ओळख आणि गैरसमज आणि हवे असलेले जलद परिणाम यामुळे काश्मीरमधे भारत सरकार पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेलं नाही....
या पुस्तकात दुलत यांनी हुर्यत सारखे फुटीरतावादी,त्यांचे नेते त्यांना मिळणारी पाकिस्तानी मदत,काश्मीर मधे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय.एस.आय . ची कार्यप्रणाली या विषयी पूर्ण माहीती देताना भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणां मधील संवाद बैठकां सारखे मोठे गौप्यस्फोट केले आहेत....दुलत यांचा दहशतवाद्यांपासून ,फुटीरतावाद्यां पर्यंत सगळ्यांशी संवाद होता...काश्मीरचे लोकप्रिय नेते व मुख्यमंत्री फारुख अबदुल्लांशी तर त्यांची खास मैत्री होती....काश्मीरचं राजकारण हाही एक महत्वाचा विषय पुस्तकामधे सविस्तर आहे यात पी.डी.पी.असो नॕशनल कॉनफरन्स या पक्षांची कार्यप्रणाली,त्यांचे नेते ,
त्यांचे छूपे अजेंडे या विषयी महत्वाची माहीती तर मिळतेच पण कशाप्रकारे फुटीरतावादी नेते भारताच्या बाजूने झुकल्या नंतर त्यांची हत्या होते याही भयानक रोमांचक घटना दुलत यांनी जवळून पाहून नमूद केल्या आहेत ...
वाजपेयी आणि मुशर्फ यांनी कशा प्रकारे काश्मीर चा प्रश्न सोडवत आणला होता परंतु मनमोहन सिंग सरकारने ही संधी वाया घालवली यावरही त्यांनी उहापोह केला आहे...
दुलत यांनी स्वतः कशाप्रकारे दहशतवाद्यांशी बोलून त्यांना मुख्य प्रवाहात आणलं हेही वाचण्या सारखं आहे यात शाबिर शहा,नईम कुरेशी,फिरदौस यांच्या सारखे बडे अतंकवादीही आहेत , तसेच इतके वर्षे भारतीय सैन्य तिथे आसल्यामुळे त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे....
काश्मीर प्रश्न भावनिक न होता अभ्यासायचा असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं कारण काश्मीरी माणूस हा अनेक वर्षे भारतीय सैन्य,फुटीरतावादी,दहशतवादी,पाकिस्तान यांच्यात पिचलेला आहे आणि वाजपेयी यांचा संवादाचा उपक्रमच यावर कसा तोडगा काढू शकतो हे यातून समोर येतं........
- प्रणव पाटील
काश्मीर -वाजपेयी पर्व
लेखक- ए.एस.दुलत
अनुवाद- चिंतामणी भिडे
इंद्रायणी प्रकाशन,पुणे
मूल्य -375