कोरे कागद...

कोरे कागद...
-अनिरुद्ध अभ्यंकर

हल्ली डोळे
बघतात सगळ 
निर्विकारपणे... 
बोथट झालेल्या जाणीवाही 
घेत नाहीत 
कसल्याच नोंदी... 
शब्दांचा पाऊस पडून 
किती वर्षे झाली 
हेही आता आठवत नाही... 
ह्याही वर्षी बहुदा 
कागद कोरेच राहणार...

Category: 

About the Author

अनिरुद्ध's picture
अनिरुद्ध

२००६ पासून विविध आंतरजालीय संकेतस्थळांवर कविता/गझल/प्रवास
वर्णन/पाककृती लेखन. 'केशवसुमार' या नावाने अंतरजालावर विडंबन लेखन.