चकवा...

चकवा...
-अनिरुद्ध अभ्यंकर

तरी मी
बजावून पाठवलं होते...
अर्थाला...
शब्दां सोबत जाताना
संदर्भांचा रस्ता 
सोडू नका...
गैरसमजाचे 
अनेक चकवे आहेत... 
नात्याच्या  या गावात...

 - अनिरुद्ध

Category: 

About the Author

अनिरुद्ध's picture
अनिरुद्ध

२००६ पासून विविध आंतरजालीय संकेतस्थळांवर कविता/गझल/प्रवास
वर्णन/पाककृती लेखन. 'केशवसुमार' या नावाने अंतरजालावर विडंबन लेखन.