
जुन्या वहीची पाने
-- अनिरुद्ध अभ्यंकर
छळतात मला हे शब्द
छळतात मला ह्या ओळी
ही तुझी आठवण
त्यातच बघ येते कातरवेळी
ही जुन्या वहीची पाने
उलटून पुन्हा मी बघतो
स्वप्नांच्या विरल्या रेषा
मी स्पर्शाने चाचपतो
हा बनेल वारा तेव्हा
छेडतो तुझी ती गाणी
अन डोळ्या मध्ये जमते
हे कुण्या काळचे पाणी
(photo credits - Sumukhi pendse)
Category: