अशी कशी ही बदलत गेली सर्व माणसे

अशी कशी ही बदलत गेली सर्व माणसे -

जुन्याच कविता पुन्हा पुन्हा मी चाळत आहे
आठवणींच्या मागे मागे धावत आहे

नका विचारू ही कोणावर लिहिली कविता
शब्द दिलेला अजूनही मी पाळत आहे

मीच मला त्या वळणावरती सोडून आलो
आठवणींचे जिथे रोपटे वाढत आहे

कितीतरी क्षण हळवे, हातातून निसटले
कुठे मला पण हिशेब त्याचा लागत आहे

नको नको ते अर्थ लावले त्या मौनाचे
नजरांचा हा स्पर्श अता मी टाळत आहे

अशी कशी ही बदलत गेली सर्व माणसे
अशा कोणत्या रस्त्यावर मी चालत आहे

Category: 
Tags: 

About the Author

admin's picture
admin