खंत

खंत
-मिलिंद फणसे

आयुष्य संपताना इतकीच खंत आहे 
आधी कधीच नव्हतो इतका जिवंत आहे

नंतर कधीच नाही होणार भेट त्याची 
डोळ्यात साठवू दे, सरता वसंत आहे

काळासवे लढाई आहे युगायुगांची 
आत्मा अवध्य आहे; तोही अनंत आहे

विसरू नका कधीही हे सत्य, प्रेमिकांनो

जडलाय जीव ज्यावरते नाशिवंत आहे

आहे काटा जुनाच हृदयी,सलही जुनाच आहे

माझ्यासवेच त्यांचा होणार अंत आहे 

हल्ली मिलिंद देखिल म्हणतो कवी स्वत:ला 
(त्याच्या घरात त्याची कीर्ती दिगंत आहे)

Category: 
Tags: 

About the Author

मिलिंद फणसे's picture
मिलिंद फणसे

आंतरजाल व ब्लॉगवर लेखन प्रकाशित.

कविता , गझला आणि अनुवाद