
अनामिके
-जुई कुलकर्णी
पन्नास कवितांच्या बदली
तीन फुलं
तीन पत्र
तीही आखीव रेखीव
मोजून मापून जगाला घाबरून , भानावरची ....
त्याचा शब्द
डुचमळता हुळहुळता हळहळता
त्याचा शब्द बेभरवशी
अस्थिर त्याचा शब्द...
त्याच्यासारखा ...... अनामिके !
तो शब्द घेऊन सुखी अस
तो शब्द जपून ठेव
खोल आत ओटी , पोटी ,
तुझ्या वारुळाच्या तळाशी .
शब्द भिजव शब्द रुजव
शब्द फुलेल शब्द फळेल .....
शब्द नाळ , शब्द बाळ
शब्द तुझ्या खोल खोल आत
शब्दच मुक्तीदाता
तुझ्याच आत अनामिके !
Category: